गुजरातमध्ये 147 विद्यार्थिनींना विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील सुरेंद्रनगर जिह्यातील एका सरकारी निवासी शाळेत तब्बल 147 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थिनींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून त्या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. या विद्यार्थिनींनी वसतिगृहात भाजी, पोळी, खिचडी आणि खीर खाल्ली होती. त्यानंतर त्यांना पोटदुखी, अतिसार आणि उलट्या सुरू झाल्या.