Mumbai News – घाटकोपर स्थानकावर एसी लोकलमध्ये ब्रेक बाइंडिंगमुळे धूर; प्रवाशांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर स्थानकात एसी लोकलमधून धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेनच्या ब्रेक बाइंडिंगमुळे ठिणग्या उडाल्याने धूर निघाल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोंबिवलीकडे जाणारी लोकल घाटकोपर स्थानकात दाखल होताच प्रवाशांना ट्रेनमधून धूर निघत असल्याचे दिसले. यानंतर एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत ट्रेनची पाहणी केली. ट्रेनला आग लागली नसून ब्रेक बाइंडिंगमुळे ठिणगी पडल्याने धूर निघाल्याचे पाहणीत निष्पन्न झाले.