
दिल्लीतील ‘जंतर मंतर’वर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. यामध्ये बॉलीवूडमधील कलाकारांनीही उघडपणे पाठिंबा दिला आहे. कोणत्या कलाकाराने काय म्हटले ते त्यांच्याच शब्दांत…
संवाद साधा
शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी केंद्र सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला हवी. – शबाना आझमी, अभिनेत्री
हिंदुस्थान तरुणांसोबत आहे
नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्याने जे विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांसोबत धोका झाला आहे. संपूर्ण हिंदुस्थान तरुणांसोबत आहे. हे आंदोलन सकारात्मकतेत बदलेल, अशी अपेक्षा आहे. – सलमान खान, अभिनेता
स्वार्थींपासून सावधान राहा
पेपर लीक झाल्याने हजारो विद्यार्थी आणि पालकांचे स्वप्न धुळीस मिळतात. जे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या भविष्याचा मार्ग निवडतात. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही मतलबी लोकांपासून सावधान राहायला हवे. – आर. माधवन, अभिनेता
आजची लढाई, ही उद्यासाठी
दिल्लीत लढत असलेले विद्यार्थी हे स्वतःसाठी लढत नाहीत. ते उद्याच्या भविष्यासाठी लढत आहेत. विद्यार्थ्यांची हिंमत आणि ठाम निर्णय पाहून थक्क झाले. या विद्यार्थ्यांचे खरेच ऐकले जात आहे का, जे उद्याचा देश सांभाळणार आहेत. – आलिया भट्ट, अभिनेत्री
बटवाऱ्याऐवजी बातचीत महत्त्वाची
दिल्लीतील आंदोलन हे केवळ विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित नाही. आता हे एक मोठी गोष्ट बनली आहे. जे आपल्या सर्वांना विचारते, आपल्याला कसा देश हवा आहे. मला वाटते आम्हाला बटवाऱ्याऐवजी बातचीत हा मार्ग निवडायला हवा. – अरमान मलिक, गायक
जेव्हा एक मुलगा रडला होता
ज्या वेळी एक मुलगा रडला होता, त्याच वेळी त्याचे ऐकायला हवे होते. त्याऐवजी आपण वाट पाहिली. कोणताही देश त्या वेळी अयशस्वी होतो, ज्या वेळी मुलांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी विद्यार्थ्यांना बॅरिकेड्टस आणि लाठीमाराचा सामना करावा लागतो. – कमल हसन, अभिनेता
सिस्टमवरून विश्वास उडू नये
कोणताही देश आपल्या तरुणांना मोठे स्वप्न पाहायला सांगू शकतो, परंतु ते स्वप्न अडचणीत सापडले असतील तर शांत बसू शकत नाही. कृपया या विद्यार्थ्यांचे ऐकून घ्या. कृपया त्यांचा सिस्टमवरून विश्वास उडता कामा नये. जे त्यांच्याकडे अपेक्षा घेऊन आले आहेत. – चित्रागंदा सिंह, अभिनेत्री
तरुणांचा आवाज ऐकायला हवा
जेव्हा तरुणांना असे वाटते की, त्यांचे कोणी ऐकत नाही, तेव्हा समाजाने त्यांचा आवाज ऐकायला हवा. प्रत्येक मताचा सन्मान आणि आदर राखला गेला पाहिजे. शांतता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. – राजकुमार राव, अभिनेता
आता नाही तर कधी जागे होणार
असा भित्रेपणा कधी पाहिला का?, या देशात हे लोक जे करत आहेत. यामुळे मला मोठय़ा वेदना होत आहेत. रागाने माझा मेंदू फुटत आहे. देशवासीय लोकहो, तुम्ही कधी जागे व्हाल. आता होणार नाही तर मग कधी होणार? – विशाल ददलानी, संगीतकार
मला विद्यार्थ्यांचा अभिमान आहे
मुंबईत आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांचा मला अभिमान आहे. देशातील आपले तरुण पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा सामना करण्याचे धाडस दाखवत आहेत. विद्यार्थ्यांना हे सगळे करावे लागतेय, याचे मला दुःख वाटत आहे. – ट्विंकल खन्ना, अभिनेत्री































































