
ख्यातनाम पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना ‘कला प्रतिष्ठान’तर्फे सुरेल मानवंदना देण्यात येणार आहे. बोरिवली पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात बुधवार, 5 ऑगस्टला रात्री 8.30 वाजता ‘सुमन सुगंध’ ही सांगीतिक मैफल रंगणार आहे. या मैफलीत माधुरी करमरकर, विद्या करलगीकर, मंदार आपटे हे सुमनताईंची अविस्मरणीय गाणी सादर करणार आहेत. संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असून मंगला खाडिलकर निवेदन करणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन विजय तारी, संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी आणि प्रफुल्ल कारेकर यांनी केले आहे. तिकिटांसाठी श्रीपृष्ण पुलकर्णी यांच्याशी 9821279284 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

























































