
‘पूर्वीच्या काळी आई-वडिलांचा शब्द अंतिम असायचा. त्यावर चर्चा व्हायची नाही. आजचा काळ वेगळा आहे. नवी पिढी प्रश्न विचारणारी आहे. त्यांना उत्तर हवे असते. त्यामुळे त्यांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधायला हवा,’ असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज व्यक्त केले. जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले. ‘मनमानी करून बळाच्या जोरावर आम्ही सर्वांचे मालक होऊ, असे कोणाला वाटत असेल तर तसे होऊ शकत नाही,’ असेही भागवत म्हणाले.


























































