
दहिसर येथील शिव योग सेंटरतर्फे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित केलेल्या या सोहळ्यात तब्बल ६० महिलांनी सहभाग घेतला होता. टाळ-चिपळ्यांच्या तालावर सुरू असलेल्या विठ्ठलनामाच्या अखंड गजराने परिसर दुमदुमून गेला होता.
समृद्ध वारकरी परंपरा, संस्कृती आणि भक्तीचा वारसा जपत, मुंबईतही पंढरपूरच्या वारीचा आनंद, शिस्त आणि भक्ती अनुभवता यावी यासाठी शिव योग सेंटरच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. योग सेंटरच्या साधिका हीना संखे, योग शिक्षिका त्रिवेणी राऊत आणि सुनंदा भट यांनी दिंडीच्या नियोजनासाठी विशेष मेहनत घेतली. कीर्तन, भजनाच्या माध्यमातून समाजापर्यंत अध्यात्म, संस्कार आणि सकारात्मकतेचा संदेश पोचवण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.



























































