
मध्य परिमंडळातील भायखळा पोलीस ठाण्यात आज रात्री आग लागली. अग्निशमन दलाने ही आग काही वेळातच विझवली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत नेमके कोणकोणत्या केसेसचे पेपर जळून गेले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भायखळा पोलीस ठाण्यात आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने काही वेळातच आग विझवली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.



























































