
Commonwealth Games 2026 मध्ये हिंदुस्थानच्या सोमनाथ राणा आणि शुभम जुयाल यांनी धडाकेबाज कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले आहे. पुरुषांच्या शॉट पुट (F57) प्रकारात हिंदुस्थानचे हे पहिलेच सुवर्ण पदक असून या सुवर्ण पदकासह सोनम राणाने देशाची मान अभिमाने उंचावली आहे. सोनम राणा सोबत शुभम जोयलनेही रौप्य पदकावर मोहोर उमटवली आहे. दोघांनीही वेगवेगळ्या अपघातात आपला एक पाय गमावल आहे. मात्र, देशासाठी पदक मिळवून अभिमाने तिरंगा फडकावण्याची त्यांची जिद्द जराही कमी झाली नाही.
सोमनाथ राणा हे 2006 मध्ये पूंछ क्षेत्रात लँडमाइन स्फोटात आपला पाय गमावण्यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर बॉक्सर होते. या दुर्घटनेनंतर त्यांनी 2017 मध्ये आर्मी पॅरालिम्पिक नोडच्या माध्यमातून पॅरा-अथलेटिक्स क्षेत्रात प्रवेश केला आणि आज हिंदुस्थानला राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. तर शुभम जोयल यांचा एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघाता पायाचा मृत्यू यामुळे लष्करी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, या संकटावर मात करत त्यांनी पॅरा-स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी रौप्य पदक जिंकले.
Double Domination 🥇🥈🇮🇳
Complete domination as our athletes finish in 1st and 2nd Place in the Men’s Shot Put F57 event. Congratulations to Soman Rana and Shubham Juyal on an incredible show!
Let’s #Cheer4Bharat 💙#WeAreTeamIndia | #TogetherWeDream pic.twitter.com/xwJ98nTIwR
— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2026


























































