मध्य प्रदेशात धावत्या एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धावत्या पेंचव्हॅली एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. डब्यात अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ट्रेन वेळेवर थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यामुळे मोठी जीवितहानी टळली.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नैनपूर-इंदूर पेंचव्हॅली एक्सप्रेस बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोला पत्थर स्थानकाजवळ येताच बी2 एसी डब्याला आग लागली. डब्यातून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या डब्यात 72 प्रवासी होते. धुरामुळे प्रवाशांना त्रास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रसंगावधान राखत वेळीच ट्रेन रोखण्यात आली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.