हे करून पहा – पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतोय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात कपडे वाळवणे म्हणजे मोठी समस्या असते. सूर्यप्रकाश नसल्याने आणि हवेतील आर्द्रतेमुळे कपडे लवकर वाळत नाहीत आणि त्यामुळे कपडय़ांना कुबट वास येतो.

दुर्गंधी घालवण्यासाठी तुरटीचा वापर करा. कपडे धुताना बादलीत तुरटीचा छोटा तुकडा किंवा पावडर टाका. कपडे 10 ते 15 मिनिटे पाण्यात तसेच ठेवा. त्यानंतर ते वाळवा.

कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये जास्त वेळ ठेवू नका. घरातील हवेशीर ठिकाणी कपडे वाळवा. ओले कपडे एकावर एक ठेवू नका. कपडे कपाटात ठेवण्यापूर्वी ते कोरडे असल्याची खात्री करा.