Yavatmal News – टाकळी धरणात तिघे बुडाले, मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपंचमी आणि श्रावण सोमवारनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच टाकळी धरणाच्या जलाशयात तीन युवक बुडाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (17 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत यवतमाळ येथील पियुष यादव, प्रथमेश यादव आणि प्रसाद सातपुते या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही युवक टाकळी येथील तलाव परिसरात गेले असताना पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिघांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह शोधून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, यवतमाळ शहरातील नागरिकांसह युवकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिघांच्या दुर्दैवी मृत्यूच्या वृत्ताने सर्वांचीच मने हेलावून गेली आहेत. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. या हृदयद्रावक घटनेमुळे टाकळी धरण परिसरात शोककळा पसरली आहे.