
शिवसेनेचे कोकणातील संघटन मजबूत करण्यासाठी गुरुवार २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बैठका होणार आहेत. उत्तर रत्नागिरी जिल्हा आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी यांच्या बैठका होणार आहेत.याबैठकीत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि उपनेते विजय कदम मार्गदर्शन करणार आहेत.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.कोकणातील सर्वसामान्य माणूस आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांसोबत आहे. शिवसेनेची हि ताकद अधिक मजबूत करून पुन्हा एकदा कोकण भगवेमय करण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.त्यापार्श्वभूमीवर दि.२१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.गुरुवार सकाळी साडे दहा वाजता चिपळूण येथील माटे सभागृहात उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे.याबैठकीत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि उपनेते विजय कदम मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गुरूवारी दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याची बैठक होणार आहे.याबैठकीत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि उपनेते विजय कदम मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत,जिल्हासंपर्क प्रमुख सुरेश कदम, जिल्हाप्रमुख दत्ता कदम आणि उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

























































