वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूमुळे बाधित मच्छीमारांना नुकसानभरपाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांच्या प्रलंबित नुकसानभरपाईबाबत निकष ठरवण्यासाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस अर्थात टीसकडून सविस्तर अभ्यास केला जात आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यांत मच्छीमारांना भरीव नुकसानभरपाई देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी यासंदर्भात व्हीसीच्या माध्यमातून बैठक झाली. कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांपैकी अद्याप काही जणांना नुकसानभरपाई मिळालेली नाही, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावेळी शिंदे यांनी याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.