डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 भरधाव वेगातील डंपरने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई कोपुल असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा नोंद केला.

शनिवारी रात्री भायखळा पोलिसांचे पथक गस्त करत होते. रात्री पावणेदहा वाजता पोलीस नियंत्रण कक्षातून पह्न आला. बॅ. नाथ पै मार्गावर अपघात झाला असून मदत हवी आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळात पोलिसांचे पथक तेथे गेले. तेथे पोलिसांना एक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला उपचारासाठी जे. जे रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. लक्ष्मी या पायी जात असताना त्यांना डंपरने धडक दिल्याचे तपासात समोर आले आहे. अपघातानंतर डंपर चालक हा पळून गेला होता. पोलिसांनी त्या डंपर चालकाचा शोध घेतला. त्या डंपर चालकाला रे रोड येथून ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.