
दिल्लीहून पाटणाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला सोमवारी सकाळी पक्षी धडकला. पाटणा विमानतळावर उतरण्यापूर्वीच वैमानिकाने विमानाच्या इंजिनजवळ पक्षी धडकल्याची माहिती दिली. यानंतर पाटणा विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे 1741 हे विमान सोमवारी सकाळी दिल्लीहून पाटणाला चालले होते. विमानात 164 प्रवासी होते. विमान पाटणा येथे उतरण्याआधीच विमानाच्या इंजिनला पक्षी धडकला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र विमान पाटणा विमानतळावर सुखरुप उतरवण्यात आले. याच विमानाने पाटनाहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले.
























































