‘लाडकी बहीण’साठी 344 कोटी वळवले, सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महायुती सरकारने आज सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर पुन्हा डल्ला मारला. या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत.

सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा हजारो कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे.

यापूर्वी वळवलेला निधी

  • फेब्रुवारी 2026 – जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये.
  • जून 2025 – एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी 410 कोटी रुपये.
  • ऑगस्ट-ऑक्टोबर 2025 – जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यांच्या वितरणासाठी प्रत्येकी 410.30 कोटी रुपये.