
आंबेगाव येथील ठक्करवाडी अंगणवाडीत बालकांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराबाबत सोशल मीडियातून आवाज उठवणाऱ्या पुणे जिह्यातील निर्भीड अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला.
व्हायरल पोस्टनंतर प्रशासनाने पारधी यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या कारवाईनंतर तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर प्रशासनाला हे निलंबन तातडीने मागे घ्यावे लागले. महाराष्ट्र शिव अंगणवाडी सेनेच्या अध्यक्षा सारिका सावंत-थदानी यांनी ठक्करवाडी अंगणवाडीला भेट देऊन रेश्मा पारधी यांचा सत्कार केला. या वेळी महाराष्ट्र शिव अंगणवाडी सेनेच्या उपाध्यक्ष विजया पवार, युवासेनेचे राहुल पडवळ, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, आप्पाजी आवटे, जिजाभाऊ आवटे, योगेश पडवळ, बाळू जाधव, सुदाम पडवळ, अशोक भालेराव, सरपंच चासकर तसेच संजय आंबटकर, बाबाजी पडवळ आणि प्रतीक आवटे आदी उपस्थित होते.



























































