थोडक्यात – 14 कोटींच्या सीमाशुल्क मागणीचा आदेश रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai High court

वाहन निर्मिती करणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आणि सेल सुपरव्हायजरी सर्किट यांच्या आयातीवर लावण्यात आलेल्या अतिरिक्त 14.07 कोटी रुपये भरण्याचा सीमाशुल्क विभागाचा निर्णय हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. तसेच हे प्रकरण पुन्हा सीमाशुल्क प्राधिकरणाकडे नव्याने सुनावणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने सीमा शुल्क विभागाला दिले आहेत.

अटकेची भीती दाखवून फसवणूक; एकाला अटक

मनी लाँडरिंगच्या गुह्यात अटकेची भीती दाखवून फसवणूक प्रकरणी एकाला चारकोप पोलिसांनी अटक केली. सायबर ठगांना बँक खाती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हे कांदिवली येथे राहतात. गेल्या ऑक्टोबरमध्ये फोन आला होता. त्याने त्याचे सिमकार्ड दोन तासात बंद होणार आहे. त्या सिमकार्डवरून फसवणुकीचा प्रकार झाला आहे. संबंधित व्यक्ती अनेकांना फोन करून त्याच्याकडे पैशाची मागणी करत आहे. परिणामी दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.