
शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली आज सोमवारी क्रांतीचौक ते खडकेश्वर अशी विश्वविक्रम मानांकन प्राप्त ‘हर हर महादेव’ कावड यात्रा काढण्यात आली. या कावड यात्रेत उज्जैन येथून खास डमरूचे भस्म रमैय्या भक्त मंडळ आले होते. तसेच बाल वारकरी मंडळ आणि महिला भजनीमंडळ सहभागी झाले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रांतीचौक येथून सकाळी १० वाजता शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे हे कावड घेऊन येताच हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, जय भंम्बबोलो च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शिवभक्त पवित्र जलकलश घेऊन यात्रेत सहभागी झाले. डिजेच्या तालावर शिवभक्तांनी ठेका धरला. त्यापाठोपाठ मनपाच्या स्वच्छता अभियानाच्या पथकाने सहभाग नोंदवला. महिला भजनी मंडळ आणि हभप नवनाथ महाराज आंधळे यांच्या वारकरी शाळेचे बाल वारकरी सहभागी झाले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील, राज्य संघटक चेतन कांबळे हे भगवे ध्वज हाती घेऊन यात्रेच्या समोर चालत होते. कावड घेऊन आमदार अंबादास दानवे यांच्यासोबत राज्य संघटक चेतन कांबळे, किसान सेनेचे नानासाहेब पळसकर, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, विठ्ठल बदर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, दिग्वीजय शेरखाने, हरिभाऊ हिवाळे, मनोज पेरे, मनोज गायके, जयसिंग होलिये, संजय हरणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उज्जैनच्या डमरू पथकाने लक्ष वेधले
कावड यात्रेसाठी उज्जैन येथून डमरू वाजविणारे भस्म रमैय्या भक्त मंडळाचे पथक आणण्यात आले. या पथकाने डमरू वाद्य वाजूवन कावड यात्रेत सहभागी झालेल्या भक्तांसह नागरिकांचे लक्ष वेधले.
पावली खेळण्यात बाल वारकरी तल्लीन
चिकलठाणा येथील हभप नवनाथ महाराज आंधळे यांच्या वारकरी शाळेतील बाल वारकारी कावड यात्रेत सहभागी झाले होते. बाल वारकारी टाळ मृदृंगाच्या तालावर पावली खेळण्यात तल्लीन झाले होते.
कावड यात्रेवर जागोजागी पुष्पवृष्टी
शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या हर हर महादेव कावड यात्रेवर जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. महिलांनी औक्षण करून कावड यात्रेचे स्वागत केले. तसेच कावड यात्रेसाठी आणण्यात आलेले पवित्र जल घेऊन तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. पैठण गेट येथे मुस्लीम समाजातर्पेâ पाणी वाटप करण्यात आले.
खडकेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक
खडकेश्वर येथे कावड यात्रा पोहचल्यानंतर विविध भागातून आणण्यात आलेले पवित्र जलाचा महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. आमदार अंबादास दानवे यांनी महादेवाला रुद्राभिषेक करून कावड यात्रेची सांगता केली.
हर हर महादेव कावड यात्रेत संपर्कप्रमुख अनिल चोरडिया, राजेंद्र काळे, विजयराव साळवे, जिल्हा संघटक सुदाम सोनवणे, डॉ. सुनील शिंदे, डॉ. शोएब हाश्मी, किसान सेना जिल्हासंघटक नानासाहेब पळसकर, बाबासाहेब मोहिते, उपजिल्हाप्रमुख बबन जाधव, अविनाश पाटील, अंकुश सुंब, संजय पिंपळे, अरविंद धिवर, जगन्नाथ पवार, विठ्ठल बदर, भाऊ सांगळे, विठ्ठल बदर, संतोष जेजुरकर, राजू इंगळे, लक्ष्मीनारायण बाखरिया, संतोष खेंडके, राजू इंगळे, किशोर कच्छवाह, तालुकाप्रमुख मनाजी पाटील मिसाळ, संजय मोटे, सुभाष कानडे, राजू वरकड, विष्णू जाधव, मनोज पेरे, आनंद भालेकर, शंकर ठोंबरे, दिनेश मुथा, सोमीनाथ करपे, रघुनाथ घडमोडे, दिलीप मचे, तालुका संघटक मनोज गायके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, वीरभद्र गादगे, डॉ. अण्णासाहेब शिदे, गणेश अधाने, रघुनाथ चव्हाण, मनपा गटनेते गणेश लोखंडे, प्रकाश कमलानी, दिनेश राजेभोसले, नितीन पवार, नंदू लबडे, रामेश्वर कोरडे, राहूल सोनवणे, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सुनीता देव, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, नंदाबाई ठोंबरे, महानगरसंघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, सुनंदा खरात, मीरा देशपांडे, नगरसेविका सुनीता सोनवणे, वैशाली कोरडे, सावित्री वाणी, स्वाती माने, रुपाली मोहिते, मंगला कापरे, मीनाक्षी कळात्रे, युवासेनेचे विभागीय सचिव धर्मराज दानवे, जिल्हायुवाधिकारी विठ्ठल डमाळे, हनुमान शिंदे, उमेश मोकासे, शुभम पिवळ, युवतीसेना सहसचिव सानिका देवराज, कोमल पांढरे, दीपाली पाटील बोरसे आदी सहभागी झाले होते.


























































