
केरळमधील रहिवासी असलेल्या दोन महिलांची अमेरिकेतील कॅलिफॉर्नियात हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या कथित हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी सुरू आहे. अंजना आणि अॅन मॅथ्यू अशी मयत महिलांची नावे आहेत. अनिला असे संशयित आरोपी महिलेचे नाव आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अंजना केरळमधील त्रिशूरमधील मुडिक्कोडे येथील रहिवासी होती तर अॅन ही तिरुवनंतपुरममधील केशवदासपुरम येथील रहिवासी होती. दोघीही आपल्या कुटुंबासह कॅलिफोर्नियातील एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. आरोपी अंजला ही कोट्टायमची रहिवासी असून ती मयत महिलांची मैत्रीण होती. अनिलाने कथितरित्या अपार्टमेंटमध्ये ॲनवर चाकूने वार केले आणि त्यानंतर अंजनाला कारने धडक दिली. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सखोल तपास करत आहेत.
























































