
जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकवणारी मोठी बातमी समोर आली असून, लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अर्जेटिनाकडून खेळताना अनेक ऐतिहासिक यश मिळवणारा आणि आपल्या जादुई खेळाने जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा हा महान फुटबॉलपटू आता पुन्हा कधीही राष्ट्रीय संघाच्या जर्सीत दिसणार नाही. मेस्सीच्या या निवृत्तीमुळे जागतिक फुटबॉलमध्ये आणि विशेषतः अर्जेटिनाच्या संघात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या नेतृत्वाखाली देशास विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या मेसीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्ण विराम दिला.
🚨🇦🇷 BREAKING NEWS: LIONEL MESSI RETIRES FROM INTERNATIONAL FOOTBALL.
Messi will not play for Argentina national team anymore. pic.twitter.com/KaiZ5Pwrw9
— Fabrizio Romano (@FabrizioRomano) August 31, 2026

























































