मणिपूरमधील गावावर सशस्त्र गटाचा हल्ला; 3 ठार 4 जखमी झाल्याचा कुकी संघटनेचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील एन. तेइखांग गावात सोमवारी सकाळी सशस्त्र हल्ला करण्यात आला. या कथित हल्ल्यात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याचा दावा कुकी संघटनेने केला आहे. हल्लेखोर हे NSCN (IM) आणि त्यांची प्रतिनिधी संघटना असलेल्या ZUF (K) चे सदस्य असल्याचा आरोप ट्विलांग एरिया कुकी सीएसओ वर्किंग कमिटीने केला आहे.

ट्विलांग एरिया कुकी सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन वर्किंग कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास हा हल्ला झाला. सुमारे 50 जणांचा सशस्त्र गट गावात शिरला आणि त्यांनी नागरिकांवर गोळीबार करून अनेक घरांना आग लावली, असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हे गाव इम्फाळ-तिपईमुख रोडवर चालवूपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.

टिंगनेइचिन ल्होवम (40), होइनेनेइंग ल्होवजेम (21) आणि लामतिनथांग ल्होवजेम (36) अशी मृतांची नावे आहेत. तर नेमनेइचोंग ल्होवजेम (50), सेलुन ल्होवजेम (70), देइलहिंग हाओकिप (55) आणि कामतिनसेई चोंगलोई (38) अशी जखमींची नावे आहेत.