
चुनाभट्टी येथील ‘निर्भया’ महिला गोविंदा पथकाने आज (31 ऑगस्ट 2026) अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला. महिला गोविंदांनी साड्या परिधान करून देवीचे रूप धारण केले आणि देवीच्या अवतारात दहीहंडी फोडली. यावेळी गोविंदा पथकातील महिलांनी देवी मातेच्या स्वरूपातील पारंपरिक नृत्य सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. देवीच्या वेशभूषेतील महिला गोविंदांचा हा अनोखा अंदाज पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती. परंपरा, महिला सक्षमीकरण आणि भक्तीचा सुंदर संगम साधत ‘निर्भया’ महिला गोविंदा पथकाने सादर केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
सर्व फोटो – रुपेश जाधव



























































