ज्येष्ठ नागरिक व महिलांना NCMC कार्ड 1 सप्टेंबरपासून अनिवार्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना NCMC कार्डद्वारेच सवलतीचे तिकीट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी NCMC कार्ड प्रवास करताना सोबत ठेवण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

सध्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांचे NCMC कार्ड नोंदणी व वितरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर इतर सवलतधारक प्रवाशांसाठीही NCMC कार्ड नोंदणी व वितरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून देण्यात आलेले NCMC कार्ड 65-75 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना 1 सप्टेंबर 2026 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे.

या तारखेपासून ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना शासनाच्या सवलतीचा लाभ घेताना सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित करण्यात येणार आहे. याशिवाय, एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या संबंधित प्रवाशांनी NCMC कार्डचे टॉप अप करून घेणे आवश्यक आहे.