
दलीप ट्रॉफी 2026 चा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. विजेतेपद पटकावण्यासाठी संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. सेमी फायनलच्या सामन्यात साउथ झोन आणि नॉर्थ झोन यांच्यात सामना अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सुरू आहे. नॉर्थ झोनचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला, ज्यामध्ये कामरान इकबालने सर्वाधिक 76 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात तिलक आणि श्रेयसच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर साउथ जोनने 385 धावा करत आघाडी घेतली आहे.
नॉर्थ झोनच्या फलंदाजांना झटपट बाद केल्यानंतर साउन झोनच्या फलंदाजांनी मोर्चा आपल्या हाती घेतला. मात्र, साउथ झोनची सुरुवाथ थोडी खराब झाली. मात्र, कर्णधार तिलक वर्मा आणि श्रेयस गोवाल यांनी संयमी खेळाच प्रदर्शन करत 225 चेंडूंमध्ये 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 106 धावांची शतक खेळी केली. एका बाजूने तिलक वर्मा कर्णधार म्हणून आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडत होता. दुसरीकडे तिलक वर्माला श्रेयस गोपालने चांगली साथ दिली. त्यानेही 169 चेंडूंचा सामना करत 11 चौकारांसह 88 धावांची खेळी केली. 12 धावांनी त्याच शतक हुकलं मात्र, त्याच्या 88 धावा संघाच्या धावसंख्येत भर घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
तिलक वर्माची या तडाखेबंद फलंदाजीमुळे त्याची आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 8 शतके झळकावली आहे. तसेच सध्या तिलक वर्मा टीम इंडियाच्या टी20 संघाचा नियमित सदस्य असून संघाला आणि निवडकर्त्यांना त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. त्याच दृष्टीने दलीप ट्रॉफीमध्ये त्याची फलंदाजी पाहायला मिळत आहे. सध्या त्याचे संपूर्ण लक्ष दलीप ट्रॉफीचा सामना जिंकून साउथ झोनला अंतिम फेरीत नेण्यावर आहे.

























































