२०० मतदारांनी एसआयआरचा अर्ज भरण्यास दिला नकार, रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ६१० नावे मतदार यादीतून वगळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाची मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिम पार पाडल्यानंतर आज प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून तब्बल १ लाख ३१ हजार ६१० नावे वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये काही मतदार मृत आहेत तर काही मतदार हे स्थलांतरित झाले आहेत. जिल्ह्यातील २०० मतदारांना एसआयआरचे अर्ज भरण्यास नकार दिल्याची माहिती पुढे आली आहे.

गेले दोन महिने मतदारयादी पुनर्निरीक्षण मोहिम राबवण्यात आली होती. २००२ च्या मतदारयादीत मॅपिंग झालेल्या मतदारांचा शोध घेण्यात आला होता. यासर्व मतदारांचे एसआयआरचे अर्ज बीएलओच्या माध्यमातून भरण्यात आले होते. आज प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात १३ लाख २९ हजार ४२ मतदारांची नावे जाहीर झाली. १ लाख ३१ हजार ६१० मतदारांची नावे वगळली गेली. त्यामध्ये ३४ हजार ६०० मतदार मृत आहेत.१५ हजार मतदार स्थलांतरित आहेत. मतदारयादीतील २०० मतदारांनी एसआयआर अर्ज स्वाक्षरी करून भरण्यास नकार दिला. ज्या नागरिकांची नावे मतदारयादीत मॅप झाली नाहीत त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत त्यांना पुढील कालावधीत पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार आहे.