
श्रावणातील तिसर्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला विशेष महत्त्व आहे, त्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक येतात. यंदा पाच लाखांहून अधिक आबालवृद्धांनी ही प्रदक्षिणा पूर्ण केली. हर हर महादेव, बम् बम् भोले अशा शिवनामाच्या जयघोषाने परिसर निनादला. पावसामुळे सर्वत्र पसरलेली हिरवळ, डोंगरावरून वाहणारे धबधबे यामुळे सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. तीर्थराज कुशावर्तावर स्नान करून भाविकांनी त्र्यंबकराजाचे मनोभावे दर्शन घेत प्रदक्षिणा अर्थात फेरी पूर्ण केली. विविध संस्था, मंडळांच्या वतीने प्रदक्षिणा मार्गावर भाविकांना साबुदाणा खिचडी, फराळ, फळे वाटप करण्यात आली. (सर्व छायाचित्रे : भूषण पाटील)
























































