
राष्ट्रीय ऍथलेटिक चॅम्पियनशिप 2026 ही 27 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत तुमकूर येथील एमजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स योजनेच्या खेळाडूंनी 4 सुवर्णपदके जिंकली.
आराव विनेरकरने (14 वर्षांखालील मुले) 400 मीटर धावणे आणि 4 x 100 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदके पटकावली. ध्रुव शिरोडकरने (17 वर्षांखालील मुले) 4 x 100 मीटर रिले आणि 4 x 400 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदके जिंकली. या दोघांनाही नीलेश पाटकर यांचे प्रशिक्षण मिळत आहे.
सुवर्ण पदक जिंकल्यावर आराव म्हणाला, ‘मी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला. हा एक उत्तम अनुभव होता. माझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी माझ्या पालकांचे आभार मानू इच्छितो.’ मीनल पालंदे (उपआयुक्त ठाणे महानगरपालिका) आणि अशोक आहेर (योजना प्रमुख) यांनी या दोन्ही खेळाडूंचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.





























































