राजापुरात मुंबई – गोवा महामार्गावर गंगातिठा भागात दोन वाहनांची समोरासमोर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मुंबई – गोवा महामार्गांवर गंगातिर्थ तिठा भागात दोन वाहनांची समोरासमोर टक्कर होऊन दोन्ही वाहनातील प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्याने घडली. या अपघातात दोन्ही वाहनांतील जखमींना राजापूर ग्रामीण रुग्णालयासह अन्य एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान या अपघातात नेमके कितीजण जखमी झाले ते मात्र समजू शकले नाही. या झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई – गोवा महामार्गांवर गोव्याच्या दिशेने मुंबई, कल्याणकडे जाणारी एम एच ०५, एफ व्ही ७२६९ ही गाडी भराधाव वेगाने आली होती. महामार्गांवर गंगातीठा या परीसरात ही गाडी आली असता अचानक ती गाडी विरुद्ध दिशेला वेगाने सरकली आणि समोरून गोव्याच्या दिशेने चाललेल्या एम एच ४६, सी एच ९१९६ या गाडीवर समोरासमोर येऊन जोरात धडकली.
त्यामध्ये दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले आहेत. नेमके किती प्रवासी दोन वाहनांतून प्रवास करीत होते. ते मात्र समजू शकले नव्हते. त्यामध्ये एक लहान मुलं असल्याची माहिती मिळाली. जखमी प्रवाशांना राजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान राजापूर पोलीस घटनास्थळासह दोन्ही रुग्णालयात दाखल झाले होते. पोलिसांकडून माहिती घेणे सुरु होते.