माँसाहेबांना राज्यभरातून भावपूर्ण आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या, वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यभरातील शिवसैनिकांनी रविवारी माँसाहेबांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळ्यास चाफ्याचा हार अर्पण करून अभिवादन केले.

शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, उपनेते विजय कदम, उपनेत्या विशाखा राऊत, उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे, आमदार महेश सावंत, बाळा नर, अजय चौधरी, सुनील शिंदे, माजी महापौर विभाग संघटक श्रद्धा जाधव, शिवसेना सचिव अॅड. साईनाथ दुर्गे, नगरसेवक निशिकांत शिंदे तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

माँसाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच  शिवसैनिकांची रीघ लागली होती. माँसाहेबांना आदरांजली म्हणून सकाळी 7 वाजल्यापासून भक्तिगीत, सुगम संगीत, भजन, कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री सिद्धिविनायक सुगम संगीत चमूचे गुणी कलाकार रविराज नर यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम आणि त्यानंतर दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळ आणि आर्यदुर्गा महिला भजन मंडळ यांच्या भजन गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ गायक राजा कदम, स्मिता तायशेटे, सुदेश पवार यांच्यासह इतर गुणी कलावंतानी सुमधुर गीतांनी माँसाहेबांना सुमनांजली अर्पण केली. माँसाहेबांच्या पुतळ्याभोवती फुलांची सजावट करण्यात आली होती.

विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, नागपूर शहर संपर्कप्रमुख राजेंद्र पगारे, डोंबिवली उपशहरप्रमुख कुणाल ढोपरे, ठाणे संपर्क संघटक ज्योती भोसले, नगरसेविका माधुरी मांजरेकर, उर्मिला पांचाळ, अर्चना शिंदे, प्रकाश आयरे, अॅड. मेराज शेख, सुरेश काळे, पद्मजा चेंबूरकर, महादेव देवळे, आरती किनरे, मृणाल यज्ञेश्वर, उर्मिला सावंत, रश्मी सुर्वे, दत्ता  घाटकर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उपनेत्या विशाखा राऊत, जी. एस. परब, प्रवीण पंडित, विकास मयेकर, नरेंद्र भोसले यांनी केले. मंडप डेकोरेशन मनोहर डेकोरेशनच्या श्रद्धा श्रीधर जाधव यांनी केले.

यावेळी गोपाळ शेलार, गजानन पाटील, जावेद खान, हेमंत नाचणे, सुधीर सोनावणे, उपविभागप्रमुख दत्ता भोसले, अभय तामोरे, राजेश कुचिक, रवींद्र घोले, शरद जाधव, प्रभाकर भोगले, गजानन सावंत, बाजीराव मालुसरे, रणजीत जाधव, रणजीत चोगले, उदय दळवी, छोटू सावंत, प्रशांत जाधव, भास्कर पिल्ले, सुहास चव्हाण, संदीप कांबळे, हमीद शेख, समीर दळवी, जिग्नेश भेदा, शैलेश माळी, अजित कदम, प्रवीण नरे, स्नेहा साटम, विनोद मोरे, माजी लक्ष्मण भोसले, प्रवीण शेटये, अरुण वाळवे, प्रदीप जोशी, आकाश परब उपस्थित होते.

भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित दळवी, चिटणीस गिरीश सावंत, प्रमोद गावकर, विजय दळवी, प्रवीण महाले, कुणाल ढापरे, सतीश हरवणकर, रूपेश धोंगडे, मीनाक्षी वेंगुर्लेकर, मनोज पवार, संजय गावकर, राजेश गोळे, राजेंद्र सकपाळ, शैलेश खामकर, प्रशांत पाटील, सदानंद पागडे, अभिजित गावसार, महेश पंट्रोल, सुनील आंब्रे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, रंजना नेवाळकर, रामचंद्र लिंबारे, शिव आरोग्य सेनेचे विलास कदम, अमोल बोरकर, प्रकाश वाणी, महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष उदय दळवी, रमेश गवळी, अरुण कुमार दुबे (पश्चिम रेल्वे), राजेश दुबे, सुधाकर नर, सुजीत नलावडे, किरण अवधुता, उमेश नाईक, उल्हास बिले, शरद एक्के, विलास जाधव, चिटणीस श्रीराम विश्वासराव, ज्योती दळवी, स्वाती आमरे, संतोष शेलार, देवा कांबळे, भट्टू अहिरे, संध्या भोईर, महेंद्र विरवटकर, अशोक जोगळे, गौरी पाटील, राजेश चव्हाण, भालचंद्र कदम, जयेंद्र चव्हाण, संतोष जाधव, संदीप चौरे, प्रथमेश कडतरकर, सुशील कुमार वर्मा, निखिल सावंत, विजय पवार, संतोष हिनुकले, बाबू कोरवानी आदींनी माँसाहेबांना आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर पवार, दिनकर पारधी, सदानंद जाधव, तुळशीदास देसाई, गौरव भोसले, प्रकाश विचारे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रमोद म्हांबळे, योगेश चव्हाण, शाखा संघटक अमोल साळवे, विजय शिसेकर, इम्तियाज शेख, महादेव शिंदे, सुरेश सावंत, शाखा संघटक किशोर पाटील, चंदन साळुंखे, अनंत डोईफोडे, विश्वास लोटलीकर, रमेश तांबे, मिलिंद कापडोस्कर, एकनाथ लाखण, संजय तेंडुलकर, योगेंद्र चेंबूरकर, दीपक गडकरी, प्रदीप नवलकर, अब्दुल रहमान कुरेशी, हेमचंद्र पाटील, अनिल सावंत, शशिकांत सांगवेकर, चंद्रकांत शिंदे, संतोष शिंदे, सलीम मुल्ला, लक्ष्मण फणसगावकर, नगरसेवक अजित कदम, जीवन पाटील, अजिंक्य म्हात्रे, ओमकार भोईर, लक्ष्मण पाटील, नरेश भोईर, प्रणीत म्हात्रे, समाधान भोईर, नितीन भोईर, विजय दळवी, मनोज हरमळकर, प्रकाश पवार, संदीप गोळे, गणेश खंडका, रोहन काळे, सुशांत गोजारे, अॅड. उमर सिद्दिकी, आझाद पटेल, पार्थ म्हांबळे, तसेच माया जाधव, कविता जाधव, आरती लोंढे, मीना पाटील, कस्तुरा पोळ, संगीता आनुते, कविता विश्वकर्मा, सुषमा महिमकर, कल्पना पालयेकर, हिरुदास, रेश्मा पाटील, विशाखा जाधव, सुवर्णा कदम, रेखा देवकर, धनश्री पवार, शर्मिला तामोरे, रिमा पारकर, विणा चव्हाण, ऋतिका पंदुगडे, नेहा शुक्ला, पुष्पा काटकर, विशाखा गावडे, त्रिवेणी वालकर, रक्षा कदम, प्रगती वाघधरे, शीतल रामाडे, सुनीता आयरे, सरिता मांजरे, राजेश्री कुपले, वंदना मोरे, कस्तुरी पोळ, भारती पोळ, भारती व्हटकर, रेखा पिंपळे, काwशिक शहा, सुमन गुरव, अंजली गोलवसकर, राबिया शेख, आशा फडवे, मानसी निरुरकर, अनुष्का कदम, गायत्री देवेंद्र, शेवंती पाटील, सुरेखा गुरव, सुजाता घोसळे, माधुरी सोलकर, रंजना पाटील, कल्पना पाटील, अनुराधा टंकसाळे, दीपाली बाणकर, गीता दावडकर, मीना मासेकर, स्मिता वाडेकर, आशा उदेशा, स्मिता बळी, रेखा पाटील, सुमित्रा साहू, शोभा पाटील, अस्मिता घाडी, रेणू शिंत्रे, स्नेहा लाड, सुलभा महाडिक, अश्विनी शिंदे, नमिता शिंदे, मंजुळा नाईक, शरयू घाणेकर, प्रीती हंबीरे, शांती कांबळी, सुनंदा शिंदे, सुनीता कपाडीया, कुंदा मयेकर, वंदना तावडे, मनीषा कवडे, पूजा पवार, अंजू यादव, मीनाक्षी पवार, सविता सदाफुले, सुमन पोळ, अर्चना पाटील, सुनंदा तांबे, मनीषा सुर्वे, सविता गुरव, प्रतिभा कदम, वंदना कुडव, सुनयना कुडव, शीला शिलकर, सुषमा गोरीले, रंजना पाटील, गीता मुळीक, मानसी घाणेकर, ज्योती कणगुटकर, आरती कुडाळकर, गीता धनवडे, प्राची पोळ, आशा पत्रेकर, वर्षा मांजरेकर, वर्षा मांढरे, शुभदा चव्हाण, संध्या भोईर, तरुणा टोपीवाला, गीता पारकर, अश्विनी वीर, ललिता पाटील, सुरेखा माळशेटये, पुष्पा पाटील, अस्मिता गोयले, मीनल बोरकर, शिल्पा मुजुमदार, शीतल कांबळे, शैला भाटकर, सुप्रिया चव्हाण, सुमन पाटील, रजनी मयेकर, कोमल गावडे, सुवर्णा पाटील, स्वाती प्रभू, उज्ज्वला गुरव, कृपा शिगवण, प्रणिता पारकर, राखी कीर, अक्षदा कीर, अक्षता पवार, सुरेखा हडकर, शीतल किणी, माया राऊळ, चंद्रा द्विवेदी, शपुंतला मेहेर, किर्ती म्हस्के, देवेंद्र भगत, नवनीत प्रभू, छोटे शिवसैनिक सनिल देवळे, विराज केळकर आदी उपस्थित होते.

रमाधाम गहिवरले

माँसाहेबांच्या आठवणीने आज ‘रमाधाम’ गहिवरून गेले. येथील आजी-आजोबांनी एकत्र येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माँसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांचे सूर रमाधाममध्ये गुंजले.