
चेन्नईतील एम. ए. चिदंबरम मैदानावर पूर्व विभाग आणि दक्षिण विभागामध्ये दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना सुरू आहे. पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशन याने अंतिम सामन्यात द्विशतक ठोकत इतिहास रचला आहे. ईशान किशन याने 270 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने 26 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली. 250 धावा (301 चेंडू) पूर्ण झाल्यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला.
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक ठोकणारा ईशान सातवा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी रमन लांबा, यशस्वी जैस्वाल, चेतेश्वर पुजारा, अंशुमन गायकवाड, युसूफ पठान आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी दुलीप ट्रॉ़फीच्या अंतिम सामन्यात द्विशतक ठोकण्याची कामगिरी केलेली आहे. तसेच अंशुमन गायकवाड (1987) यांच्यानंतर अंतिम सामन्यात द्विशतक ठोकणारा ईशान दुसराच कर्णधार ठरला आहे.
That moment when Ishan Kishan reached 2️⃣5️⃣0️⃣ 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/KQf5Km69nk#DuleepTrophy | #SZvEZ pic.twitter.com/6YJYiwNtjV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 7, 2026
दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये द्विशतक ठोकणारे खेळाडू (‘हिंदुस्थान टाइम्स‘च्या वृत्तानुसार)
- रमन लांबा – 320 धावा
- यशस्वी जैस्वाल – 265 धावा
- चेतेश्वर पुजारा – 256 धावा
- अंशुमन गायकवाड – 216 धावा
- युसूफ पठाण – 210* धावा
- मन्सूर अली खान पतौडी – 200 धावा
- ईशान किशन – 250 धावा (रिटायर्ड हर्ट)
दरम्यान, ईशान किशन आणि कुमार कुशाग्र या जोडीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पूर्व विभागाने सामन्यावर पकड मिळवली आहे. ईशानने 250 धावा केल्या, तर कुशाग्रनेही त्याला उत्तम साथ देत 101 धावांची शतकी खेळी केली आणि संघाला 600 पार पोहोचवले.
तत्पूर्वी पहिल्या दिवशी अभिमन्यू ईश्वरन (72), वैभव सूर्यवंशी (44) आणि शिखर मोहन (85) यांनी फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दुसऱ्या दिवशीही ईशान-कुशाग्रने हा धावांचा रतीब कायम राखला. ईशान आणि कुशाग्र माघारी परतल्यानंतरही पूर्व विभागाने आपला डाव घोषित केलेला नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पूर्व विभागाच्या 142 षटकात 6 बाद 645 धावा झाल्या होत्या.
काय रे हा व्हाइस-कॅप्टन! पंचांना करावा लागला हस्तक्षेप; तिलकची स्लेजिंग, वैभवही भिडला



























































