महेशचंद्र त्रिपाठी यांची हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती झाल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती त्रिपाठी हे मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायमूर्ती असून आज लोकभवन येथे राज्यपाल जीष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी पार पडला. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी 1990 मध्ये लखनऊ विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली असून 11 जानेवारी 1992 रोजी त्यांची वकील म्हणून नोंदणी करण्यात आली. त्यांनी अनेक दिवाणी खटल्यांमध्ये वकिली केली असून ऑक्टोबर 2007 पासून ते उत्तर प्रदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य स्थायी वकील म्हणून कार्यरत होते.