
कोणाकडे जर भरपूर पैसे असतील तर हे असले पुरस्कार मिळवून देण्यासाठी काम करणारे दलालसुद्धा आहेत. अशा शब्दात ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडनमधील पुरस्कारांचा पर्दाफाश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडनच्या संसदेतर्फे पुरस्कार जाहिर झाले असून, त्यामुळे महाराष्ट्राची शान वाढली, असा गवगवा सोशल मिडियावर सुरु आहे. या पार्श्वभूमिवर अॅड. असीम सरोदे यांनी त्यांची खिल्ली उडवत वस्तूस्थिती स्पष्ट केली. मात्र इंडो-युरोप बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशीप फोरम या खासगी संस्थांतर्फे हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. असे पुरस्कार घाऊक पद्धतीने दिले जातात. पुरस्कारांचे वितरण युके पार्लमेंटमधील हाऊस ऑफ कॉमर्सच्या सभागृहात होणार असले तरी ते युके गर्व्हन्मेंटतर्फे दिले जातात, असा गैरसमज पुणीही करून घेऊ नये, असे अॅड, सरोदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे तंतोतंत नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेऊन वागत आहेत. असा टोलाही अॅड. असीम सरोदे यांनी लगावला.
युके पार्लमेंटतर्फे खासगी संस्थांना त्यांच्या चांगल्या कार्यक्रमांसाठी हा हॉल फक्त वापरण्यासाठी दिला जातो. संसदेचा त्याच्याशी काही संबंध नाही. असे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असिम सरोदे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंना लंडन मध्ये जे पुरस्कार मिळणार आहेत ते लंडनच्या संसदेतर्फे दिले जात नाहीत. इंडो-युरोप बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरम या खाजगी संस्थांतर्फे ते पुरस्कार दिले जातात. युके पार्लमेंटमध्ये ते पुरस्कार दिले जातात म्हणजे ते युके गव्हर्नमेंट तर्फे दिले जातात असा गैरसमज…
— Asim Sarode (@AsimSarode) September 9, 2026



























































