
नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आज हिंदुस्थानात पोहोचले. ते तीन दिवस हिंदुस्थानात असतील. याशिवाय चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग हेदेखील दाखल झाले. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. संरक्षण, ऊर्जा, व्यापार आणि नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची आहे. या भेटीत मोदींनी पुतीन यांना तामीळ कवी थिरुवल्लुवर यांच्या रशियन भाषेत अनुवादित केलेल्या ‘थिरुकुरल’ पुस्तकाची प्रत भेट दिली.




























































