दोन दिवसांत उत्सव सुरू होतोय, परवानग्या तत्काळ द्या, मुलुंडमधील गणेश मंडळाला दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांत गणेशोत्सव सुरू होतोय. तेव्हा महापालिकेसह सर्व प्रशासनाने मुलुंड येथील गणेश मंडळाला लवकरात लवकर सर्व परवानग्या द्याव्यात, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

नियमानुसार अर्ज करूनही परवानगी न मिळाल्याने श्री गजानन सामाजिक मित्र मंडळाने याचिका दाखल केली. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. गेल्या वर्षी परवानगी देण्यात आली होती. या वर्षी ही परवानगी मिळालेली नाही, असे मंडळाने न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

नियमांचे पालन करणार

आम्ही वेळेत लाऊडस्पीकर बंद करू. प्रदूषण व अन्य नियमांचे उल्लंघन करणार नाही. मंडप नियमानुसार उभा केला जाईल. गणेशमूर्ती तीन फुटांची असून पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात त्याचे विसर्जन केले जाईल, अशी हमी मंडळाने दिली आहे.