भाजपला सर्व हिजाब अमान्य नाहीत, ब्रिक्स परिषदेपूर्वी झोपडपट्ट्या लपवल्यावरून पवन खेडा यांचा केंद्रावर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर विदेशी पाहुण्यांच्या मार्गावरील झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्यांसमोर मोठे पडदे व तात्पुरते बॅरिकेड्स उभे करून त्या लपवल्या जात आहेत. या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दारिद्र्यासारख्या सामाजिक-आर्थिक वास्तवावर उपाय शोधण्याऐवजी सरकार ते परदेशी पाहुण्यांच्या नजरेपासून लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पवन खेडा यांनी केला आहे.

या प्रकरणावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करत पवन खेडा यांनी लिहिले की, “भाजपला सर्व हिजाब अमान्य नसतात. मोदींच्या अपयशाला झाकणारा हिजाब (पडदा) मात्र त्यांचा अत्यंत आवडता आहे.”