प्रसिद्ध पॉप स्टार लेडी गागा झाली आई, मुलगा की मुलगी हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध पॉप स्टार आणि अभिनेत्री लेडी गागा (Lady Gaga) आई झाली आहे. लेडी गागा आणि तिचा होणारा नवरा मायकेल पोलान्स्की यांचे हे पहिले मूल आहे. हे जोडपे उत्तर कॅलिफोर्नियामध्ये आपल्या नवजात बाळासोबत फिरताना दिसून आले, ज्यानंतर ही गोड बातमी समोर आली.

४० वर्षीय लेडी गागा आणि ४२ वर्षीय उद्योजक मायकेल पोलान्स्की यांची पहिली भेट सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती. त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये गागाच्या वाढदिवसानंतर या दोघांनी साखरपुडा केला होता. आता या जोडप्याच्या घरात पहिल्या बाळाचे आगमन झाले आहे.

बाळाचा जन्म नेमका कधी झाला आणि तिला मुलगा आहे की मुलगी, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या जोडप्याने सोशल मीडियावर या संदर्भात कोणतीही घोषणा केलेली नसून, गागाने गरोदरपणाची बातमीही चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. एप्रिल महिन्यात तिचा ‘मेहेम बॉल टूर’ (Mayhem Ball Tour) पूर्ण झाल्यानंतर ती सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होती.