
गणेशोत्सवात भक्तीबरोबरच सुरक्षितता, शिस्त, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
गणेशोत्सव मंडळांनी मंडप, विद्युत व्यवस्था, तसेच गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करावी; आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे; गर्दी व्यवस्थापनासाठी भक्कम नियोजन करावे, तसेच गणेशोत्सवात व्यसनमुक्ती, महिला व बालसुरक्षा, रक्तदान, अवयवदान, शिक्षण आणि आरोग्य यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरा करावा, असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.























































