
लालबागचा राजाच्या चरणी पहिल्या तीन दिवसांत भाविकांनी मुक्तहस्ते दान केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दानपेटीत पहिल्या 3 दिवसांत 1 कोटी 90 लाख रुपये रोख, 647.47 ग्रॅम सोने आणि सुमारे 12 हजार 389 ग्रॅम चांदीचे दागिने मिळाले आहेत. सर्व दानाची एकूण किंमत सुमारे 3 कोटी 18 लाख रुपये असल्याची माहिती मंडळाच्या व्यवस्थापन समितीने दिली.
दानपात्रांची मोजणी
लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी सोन्या-चांदीच्या वस्तूही दान केल्या आहेत. त्यात 32 किलो सोन्याचा समावेश आहे. त्याची अंदाजे पिंमत 49 कोटीहून अधिक आहे. त्याचबरोबर चांदीचे नक्षीकाम केलेले दागिने, पेन, बांगडय़ा आणि चांदीची क्रिकेट बॅट अर्पण केली आहे.

























































