
पाच दिवस मनोभावी सेवा केल्यानंतर शुक्रवारी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ घोषात गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला अत्यंत भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला. भक्तिभावाने अवघी मुंबई न्हाऊन निघाली. मुंबईतील कृत्रिम तलाव परिसरात गणपती विसर्जनासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती. मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर ढोल-ताशांचा गजर सुरू होता. भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विसर्जनसाठी महापालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था केली होती. रात्री 9 वाजेपर्यंतच्या 175 सार्वजनिक, 12463 घरगुती असे एकूण 12638 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

























































