
रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मिशन फिनिक्स अंतर्गत धडक कारवाई केली आहे.पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत १६ गुन्हे दाखल केले असून २२ आरोपींना अटक केली आहे.या कारवाई दरम्यान पोलिसांनी ७७ हजार रुपये किमतीचे ब्राऊन हेरॉईन आणि १ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलिसांनी हि कारवाई केली आहे.अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर १० गुन्हे आणि अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रत्नसेतू चॅटबॉटवर माहिती कळवा
रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवण किंवा सेवन होत असल्यास नागरिकांनी त्याची माहिती रत्नसेतू चॅटबॉट -९३७१४१५६१२ या क्रमांकावर कळवावी असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.अंमली पदार्थाच्या विळख्यातून समाजाला दूर ठेवण्यासाठी मिशन फिनिक्स अंतर्गत पोलीस जनजागृती मोहीम राबवत आहेत.





























































