
लालबाग-काळाचौकी परिसरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविकांची अलोट गर्दी उसळलेली असतानाच रविवारी पहाटेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. काळाचौकी येथील ‘महागणपती उत्सव मंडळ’ परिसरात पिण्याच्या पाण्याच्या तात्पुरत्या स्टॉलवर अचानक विद्युत प्रवाह उतरला. यावेळी पाणी पिण्यासाठी आलेल्या आठ वर्षांच्या चिमुकलीसह 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण जखमी झाले आहेत.
आपत्कालीन व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील ‘महागणपती उत्सव मंडळ’ प्रवेशद्वाराजवळ पिण्याच्या पाण्याचा तात्पुरता स्टॉल उभारण्यात आला होता. रविवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास या स्टॉलच्या परिसरात अचानक वीजप्रवाह उतरला. यामुळे अनेकांना विजेचा धक्का बसला. विद्युत प्रवाह पसरल्याचे लक्षात येताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने मुख्य वीजपुरवठा खंडित केला आणि सावधगिरीचा उपाय म्हणून तो संपूर्ण परिसर सील केला.
घटनेची माहिती मिळताच बेस्टचे अधिकारी आणि काळाचौकी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दिग्विजय मिल चाळ परिसरातील पोल क्रमांक ‘DLM-14’ जवळ गणेशोत्सव रोषणाई आणि कोल्ड ड्रिंक स्टॉलसाठी बसवलेल्या तात्पुरत्या मीटरची (मीटर क्र. M217392) तपासणी करण्यात आली. तपासणीपूर्वीच स्थानिक इलेक्ट्रिशियनने मीटरची वायरिंग व MCB पूर्णपणे खंडित केले होते. खबरदारी म्हणून परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला असून स्थानिक पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.
लालबागमध्ये पुण्याच्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
चिमुकलीसह महिलेचा मृत्यू
दरम्यान, या दुर्घटनेत एकूण 6 जण होरपळले होते. जखमींना तातडीने भायखळा येथील मसिना रुग्णालय आणि परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रागिणी घनश्याम यादव (वय – 8) हिला डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. तर सुजाता (वय – 33) यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. किरण नाईक (वय – 19), तन्वी नरेश हांडे (वय – 19), साहिल संदीप तरे (वय – 19) या तिघांची प्रकृती स्थिर असून रुही सिंग (वय – 12) हिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
STORY | 2 dead, 4 injured in electrocution incident in Lalbaug
Two persons, including an eight-year-old girl, were killed and several others injured in an electrocution incident near a Ganapati pandal in Mumbai’s Lalbaug area early Sunday, officials said.
READ:… pic.twitter.com/XvBcKEesqt
— Press Trust of India (@PTI_News) September 20, 2026






























































