
हिंदुस्थानच्या पुरुषांच्या बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या मोहिमेची दणदणीत विजयाने सुरुवात केली. हिंदुस्थानने बांगलादेशला 3-0 असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले.
लक्ष्य सेनची दमदार सुरुवात
स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने सुरुवातीपासूनच बांगलादेशच्या आयमान इब्न जमानवर वर्चस्व गाजवले. लक्ष्यने पहिला गेम 21-4 ने सहज जिंकला. दुसऱया गेममध्येही लक्ष्यने आपला वेग कायम ठेवत तो गेम 21-12 ने जिंकला. या विजयामुळे हिंदुस्थानने 1-0 अशी आघाडी घेतली.
आयुष शेट्टीची दुहेरीतील आघाडी
दुसऱया सामन्यात आयुष शेट्टी कोर्टवर उतरला. त्याने गौरव सिंगाविरुद्ध पहिला गेम 21-4 ने जिंकला. त्याने दुसऱया गेममध्येही आपले वर्चस्व कायम ठेवत 21-13 ने विजय मिळवला आणि हिंदुस्थानला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. श्रीकांतने बांगलादेशचा धुव्वा उडवला.
तिसऱया सामन्यात किदाम्बी श्रीकांतचा सामना जुमार अल-अमीनशी झाला. पहिल्या गेममध्ये त्याने 21-15 ने विजय मिळवून भारताला आघाडी मिळवून दिली. दुसऱया गेममध्ये त्याने 21-10 ने जिंपून सामना आपल्या नावावर केला आणि हिंदुस्थानला 3-0 ने विजय मिळवून दिला.



























































