
महाराष्ट्र एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आरोग्यास हानिकारक उत्पादनांच्या जाहिरातींबाबत कडक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित उत्पादनांच्या जाहीरातींबाबत मुंढे यांनी कलाकारांना इशारा दिला आहे. मुंढे यांनी एक्सवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये, राष्ट्रपती चित्रपट कलाकारांना सार्वजनिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकणाऱ्या उत्पादनांचा प्रचार न करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. कुणीही कायद्यापेक्षा मोठे नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र एफडीएने यापूर्वीच सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या जाहिराती आणि प्रचारात्मक साहित्यासंदर्भात अनेक कलाकारांना नोटिसा बजावल्या आहेत. कुणीही कायद्यापेक्षा मोठे नाही, असे हा व्हिडिओ शेअर करताना तुकाराम मुंढे यांनी लिहिले आहे. सेलिब्रिटींचा प्रभाव हा लोकांमध्ये अनारोग्यकारक सवयींना प्रोत्साहन देण्याचा परवाना असू शकत नाही, अशा कडक शब्दात मुंढे यांनी कलाकरांची कानउघडणी केली आहे.
व्यावसायिक हितसंबंध कधीही सार्वजनिक आरोग्यापेक्षा मोठे असू शकत नाहीत आणि सेलिब्रिटींनी आपल्या प्रभावाचा जबाबदारीने वापर केला पाहिजे, असेही मुंढे यांनी पुढे नमूद केले आहे.
राष्ट्रपती काय म्हणाल्या?
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बोलताना राष्ट्रपती मुर्मू यांनी उत्पादनांच्या जाहिरातींबाबत कलाकारांना आवाहन केले आहे. चित्रपट कलाकारांचा समाजावर महत्त्वपूर्ण प्रभाव असतो. जर कलाकार शिस्तबद्ध जीवनशैलीची प्रेरणा देत तिचा प्रचार करत असतील, तर लाखो तरुण त्यांचे अनुकरण करतात. मी चित्रपट कलाकारांना विनंती करते की, त्यांनी आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या गोष्टींचे सेवन करू नये किंवा त्यांचा प्रचार करू नये. खरा कलाकार तोच असतो जो समाजाला चांगला दृष्टीकोन देतो.
दरम्यान, अलीकडेच महाराष्ट्र एफडीएने अनेक चित्रपट कलाकार आणि ब्रँड ॲम्बेसेडर यांना नोटिसा बजावल्या आहेत. ज्या उत्पादनांच्या जाहिरातींमुळे आरोग्याविषयी चिंता निर्माण झाली होती, त्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली.
Influence is not immunity.
Artists, like everyone else, must respect the law and recognise the responsibility that comes with endorsing products, behaviours and habits that shape public choices.
When influence is used to endorse food products, public health cannot be an…
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) September 23, 2026

























































