
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-मंडणगड हे तालुके एका टोकाला असल्याने प्रशासकीय कामांसाठी रत्नागिरीत जिल्ह्याच्या ठिकाणी येणे अनेकवेळा त्रासदायक आणि खर्चिक होत होते. आता त्या त्रासातून त्यांची मुक्तता होणार असून दापोली येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालया सुर होणार आहे.राज्य शासनाच्या महसूल विभागाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय दापोलीत सुर करणार असल्याचे जाहिर केले आहें
जिल्ह्यांचे मोठे भौगोलिक अंतर आणि वाढती लोकसंख्या विचारात घेता, नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी होणारा प्रवास, वेळ व आर्थिक भुर्दंड वाचणार आहे.कामांचा वाढता व्याप कमी होणार असून मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयांवरील कामाचा ताण कमी होऊन स्थानिक पातळीवरील प्रश्न त्वरित मार्गी लागण्यास मदत होईल. महसुली कायदे, जमीन विषयक बाबी, पुनर्वसन, आणि इतर तातडीच्या प्रशासकीय निर्णयांना या नवीन कार्यालयांमुळे मोठी गती मिळणार आहे.

























































