
पुरुषांच्या सांघिक बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानला चीनकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. निर्णायक चौथ्या सामन्यात हे जी टिंग आणि लियू यी यांनी हरिहरन अम्साकरुणन आणि एम. आर. अर्जुन यांचा 21-16, 17-21, 21-9 असा पराभव केला. लक्ष्य सेन आणि अयुष शेट्टी यांच्या पराभवानंतर सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी हिंदुस्थानला सामन्यात परत आणले. त्यांनी विद्यमान विश्वविजेते लियांग वेइपेंग आणि वांग चांग यांना पराभूत केले, मात्र त्यानंतर हिंदुस्थानला सामना वाचवता आला नाही.





























































