
युद्ध, संघर्ष आणि अस्थिरतेने वेढलेल्या आजच्या जगात माणसाच्या मनात निर्माण होणारी घालमेल, अस्वस्थता आणि तणाव दूर करून पुन्हा शांततेकडे नेण्याची ताकद कोणत्याही भाषेपलीकडील एका माध्यमात आहे. ते माध्यम म्हणजे संगीत. याच विचाराला कलात्मक आणि पर्यावरणपूरक स्वरूप देत यंदा परळचा महाराजा ‘सांगीतिक महाला’त विराजमान झाला आहे. परळचा महाराजाची ‘बॅलन्सिंग’ मूर्तीदेखील गेल्या काही वर्षांपासून गणेशभक्तांच्या आकर्षणाचा विषय ठरतेय.






























































