
सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा जामीन अर्ज भिवंडी सत्र जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
१७ सप्टेंबरला पडघा पोलीस ठाण्यात माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलीस शैलेश पाटील यांच्यावर एका पीडित महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर नरेंद्र पवार हे फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी सहा पथके तैनात करून शोध सुरू केला आहे. दरम्यान मंगळवारी नरेंद्र पवार यांनी भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला असून उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





























































