
लैंगिक अत्याचार, खून आणि दरोड्यासारख्या गुन्ह्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या कुख्यात दुकलीला ठाणे विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे ३० लाखांचा दंडही ठोठावला आहे. विशेष म्हणजे, लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात मोक्का कायद्यांतर्गत देशात पहिल्यांदाच ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील प्रगती नगरमध्ये कुख्यात आरोपी मोनू रायडर ऊर्फ निशांत मनोजकुमार मिश्रा याने त्याचा साथीदार नीरज ओमप्रकाश राय याच्या मदतीने रात्री मजुराला घराचे दार उघडण्यास भाग पाडून चाकूचा धाक दाखवून निशांत याने मजुराच्या पत्नीला मारहाण करून बलात्कार केला होता.































































