
पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची सुनावणी सोमवार 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.
पंढरीनाथ आंबेरकर याने खालावलेली तब्येत व मानसिक तणाव हे मुख्य कारण जामीन अर्जात नमूद केले आहे. तसेच महत्वाच्या साक्षीदारांची साक्ष व उलट तपासणी झाली असल्याने आता जामीन द्यावा अशी याचना अर्जात करण्यात आली आहे.
महानगरी टाइम्सचे पत्रकार शशिकांत वारिशे याला पंढरीनाथ आंबेरकर याने थार गाडीने उडवले होते. दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. पत्रकारांच्या हत्या व सुरक्षिततेचा मुद्दा पत्रकार संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने त्यावेळी चर्चेत आला होता. सर्व पत्रकार संघटनानी त्यावेळी आरोपी विरुद्ध कडक कारवाईची मागणी केली होती.




























































